महापोर्टलच्या अडचणींबाबत आ. बाबर यांचा विधानसभेत प्रश्न

राज्यातील महाऑनलाईन पोर्टल सुरळीत कार्यरत नसल्याने नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सुहास बाबर यांनी बुधवारी विधानसभेत(Assembly) पॉईंट ऑफ इंफॉर्मेशनच्या माध्यमातून हा मुद्दा मांडला . सध्या राज्यात उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. तहसील कार्यालयांमध्ये डोमिसाईल , नॉन- क्रिमिलियर , जात प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला मिळवताना विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मुद्यावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत नुसत्या टोकनवरदेखील विध्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल , अशी ग्वाही सभागृहात दिली आमदार सुहास बाबर यांनी यावेळी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये , याची दक्षता घेण्याची मागणी केली.