विटा येथील शेतकरी बचत भवनमध्ये समर्पण फाउंडेशन व विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मकरसंक्रांतीनिमित्त हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही समारंभाच्या केळी सर्वच जाती धर्मातील महिलांचा सहभाग होता. विशेष करून मुस्लिम महिलांनीही दरवर्षीप्रमाणे उत्साहाने उपस्थिती दाखवली. विटा शहरातील शासकीय व प्रशासकीय कार्यालयातील मान्यवर महिला अधिकारी व कर्मचारी यांचाही सन्मान केला. या समारंभामध्ये सौभाग्यवतीं पासून श्रीमतीपर्यंत सर्वच महिलांचा सन्मान करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम शांततेत उत्साहात व नियोजनबद्ध रीतीने पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन, समर्पण फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. शीतल अमोल बाबर यांनी केले.
यावेळी बोलताना डॉ. शीतल बाबर म्हणाल्या, संक्रांतीनिमित्त आयोजित हळदी-कुंकू समारंभ म्हणजे समाजातील प्रत्येक स्तरातील व प्रत्येक परिस्थितील महिलेला कुंकवाचा मान मिळवून देणे, मग ती सौभाग्यावती असो किंवा श्रीमती असो, गरीब असो की श्रीमंत असो, लहान असो की मोठी असो. या वर्षी वाण म्हणून दिलेली वस्तू म्हणजे रोज वापरता येणारी पर्स. यामागची भावना म्हणजे घरोघरी लक्ष्मीचा वास असो आणि घरोघरी समृद्धि नांदो. यावेळी प्रा. सौ. सोनिया सुहास बाबर, भक्ति टोणपे, रूपाली धर्मेश पाटील, नेहा डोये, मेघा गुळवणी, मंजिरी गुळवणी, पूजा प्रसाद म्हेत्रे, वनिता अमर शितोळे, वैशाली तुधार बोथे, रूपाली सुरेश चोथे, अश्विनी श्रीकांत राऊत, वर्षा श्रीकांत साळुंखे, वसुधा मिलिंद कदम, अर्चना अजित बाबर, रोहिणी अभिजीत पवार, सुजाता विकास पवार, रसिका प्रकाश सपकाळ, अपर्णा रंजित पाटील, दीपाली राजू तोडकर, शिवानी प्रकाश महाजन, सुनीता भंडारे, प्रियांका किरण जाधव, स्नेहल संजय जाधव, माया सुनील फासे, वंदना शंकर फासे, सुमती सुनिल फासे उपस्थित होत्या.
