भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या टेस्ट सीरिजचा तिसरा सामना 10 जुलै पासून लॉर्ड्स मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये टॉस पार पडला, हा टॉस इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने जिंकला असून त्याने प्रथम फलंदाजी निवडली आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स मैदानावर सामन्याच्या पहिल्या दिवशी टॉस पार पडला. हा टॉस इंग्लंडने जिंकला आणि प्रथम फलंदाजी निवडली. तर त्यामुळे भारताला प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात यावं लागलं. टॉस झाल्यावर टीम इंडियाचा कर्णधार गिलने प्लेईंग ११ (playing 11.) जाहीर केली यात प्रसिद्ध कृष्णाला बाहेर कडून जसप्रीत बुमराहला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा गोलंदाजी अटॅक अधिक मजबूत होईल. तर इंग्लडने सुद्धा प्लेईंग 11 मध्ये एक बदल केला असून टॉंग ऐवजी जोफ्रा आर्चरला संधी देण्यात आलीये.
आज सकाळपर्यंत मी गोंधळलो होतो की टॉस जिंकलो तर काय करावे. जिंकलो असतो तर मी प्रथम गोलंदाजी केली असती. पहिल्या सत्रात गोलंदाजांसाठी काहीतरी असेल. गोलंदाजांना आता आत्मविश्वास वाटत आहे, एजबॅस्टन विकेटवर २० बळी घेणे सोपे नव्हते. आम्ही प्लेईंग ११ मध्ये एक बदल करतोय आणि प्रसिद्ध कृष्णाच्या ऐवजी जसप्रीत बुमराहला संधी दिली आहे.
