‘गुरुकुल ‘ चे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश

आटपाडी , येथील श्री विष्णुपंत रामचंद्र लोणारी (दादरे ) ‘गुरुकुल ‘ निवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने आठवी स्कॉलरशिप परीक्षेत यश मिळवले आहे. २ विद्यार्थी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत झळकले आहे, तर ९ विद्यार्थी स्कॉलरशिपसाठी पात्र ठरले आहेत.

यशराज ज्ञानदेव घोडकेने ९२ टक्के गुण मिळवून राज्यात ९ वा, जिल्ह्यात ४ था व तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. वरद मोहन गळवेने गणितात १०० पैकी १०० गुणांसह ९१.३३ टक्के गुण मिळवून राज्यात १४ वा, जिल्ह्यात ६ वा द्वितीय येण्याचा मान मिळवला. अथर्व शामराव शिंदेने ८४ टक्के गुण मिळवून तालुक्यात ९ वा क्रमांक पटकावला. सर्व विद्यार्थ्यांना डी. डी . आटपाडकर , व्ही. बी. वलेकर, डी. व्ही. गळवे व एस . एल. माने यांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विद्यार्थी मार्गदर्शक यांचा गुरुकुलचे मख्यध्यापक पोपट साळुंखे , संस्थेचे अध्यक्ष वसंतराव सांगोलकर , उपाध्यक्ष भरत बाड, सचिव नितीन काळेल, संस्थेचे प्रवर्तक महादेव बाड यांनी गौरव केला.