चोरट्याचा बियर बारवर डल्ला

सांगोला, कटफळ (ता. सांगोला) येथे अज्ञात चोरट्यानी हॉटेल जलसा बियर बार ॲण्ड परमिट रूममधून सुमारे १ लाख २७ हजार ६४० रुपये किंमतीचे विविध कंपनीच्या दारू, बियरच्या बाटल्या, सिगारेट पाकीट व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली.

 नानासाहेब पिंगळे (रा. कटफळ ता. सांगोला) यांनी सांगोला पोलीसात फिर्याद दिली. पिंगळे हे हॉटेल बंद करून घरी गेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हॉटेलच्या पाठीमागे असलेले पत्र्याच्या रूम (गोडावून) मध्ये ठेवलेले दारूचे बॉक्स कमी दिसले, म्हणून पाहणी केली असता सुमारे १ लाख २३ हजार ४७० रुपये किमतीच्या दारू व बियरच्या बाटल्या तसेच सुमारे २ हजार १७० रुपये रोख रक्कम व सुमारे २ हजार रुपये किंमतीचे सिगारेटची पाकीटे चोरीस गेले असल्याचे लक्षात आले.