दुष्काळी भागातील शेवटच्या घटकापर्यंत पाणी पोहोचेपर्यंत समन्यायी पाणी (Water) वाटप चळवळ थांबणार नाही असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिला.आटपाडीत क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांची जयंती व क्रांतिवीरांगणा इंदुताई पाटणकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित पाणी परिषेदेत ते निकम , साहेबराव चवरे , जनार्दन झिंवल , मोहनराव यादव , गणेसह बाबर , व्ही .एन .देशमुख , के.जे जॉय , किरण लोहकरे उपस्थित होते.
पाणी चळवळीत योगदान देणाऱ्या अण्णासाहेब लेंगरे , अण्णासाहेब पत्की ,धुळा झिंबल ॲड . उस्मान शेख , सीताराम पुजारी , मारुती माने यांना अभिवादन केले. डॉ. पाटणकर म्हणाले समन्यायी पाणी वाटप ही केवळ योजना नसून ती एक लोकचळवळ आहे. प्रत्येक कुटुंबाला पाणी हे ध्येय गाठण्यासाठी चळवळीने अनेक टप्पे पार केले आहेत. खरसुंडी आणि घाणंद वितरिकांवरील सर्व पाणी वापर संस्थांचे एकमत झाले असून ,इतर गावांमध्ये संस्था स्थापन करण्याचे काम सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. पुढीलवर्षी १५ जुलैरोजी आटपाडीच्या श्री भवानी विद्यालयाच्या मैदानावर पहिल्या परिषदेसारखीच भव्य परिषेद घेण्याची घोषणा त्यांनी जाहीर केली. तसेच परिषेदेत पुढील वर्षाचा कृती कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
