आळसंदला मंगळवारी भाजप कार्यकर्ता मेळावा

विटा, खानापूर तालुक्यातील आळसंद येथे २२ जुलै रोजी भाजप कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजिला असून या मेळाव्यास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आ. सदाभाऊ खोत आणि आ. गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 ब्रह्मानंद पडळकर म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात कार्यकर्ता संवाद मेळावा आणि नवीन कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश सुरु आहेत. त्यासाठी मंगळवारी २२ जुलै रोजी आळसंद येथील श्री प्रभू राम मल्टीपर्पज हॉलमध्ये मेळावा आयोजित केला आहे. याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष दाजी पवार, ओबीसी नेते संग्राम माने यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. आळसंद येथे होणाऱ्या मेळाव्यास भाजपामध्ये नुकताच प्रवेश केलेल्या माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांना निमंत्रित करण्यात आले आहे का ? असा प्रश्न विचारला असता त्यांचा निर्णय वरिष्ठ पातळीवरील नेते घेतील, अशी प्रतिक्रिया ब्रह्मानंद पडळकर यांनी दिली.