सांगोला शहरातील महूदरोड रेल्वेगेटजवळ रस्त्याच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या मार्गावरून दुचाकी चालक व पादचारी , शालेय मुले यांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली आहे. महूद रोडचे काम चालू असल्याने हे पाणी रेल्वे रुळाच्या पश्चिमेस मोठ्या प्रमाणात साचल्याने प्रवास करणे अवघड व धोक्याचे झाले आहे. महूद रेल्वे गेटजवळ खराब रस्त्यामुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत .
महूद रेल्वे गेट परिसरात रस्त्याचे काम सुरु असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून वाहनचालकांचे अतोनात हाल सुरु आहेत. या खड्ड्यामुळे वाहनांचे अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. दुचाकी स्कूटर पाण्यात अडकत असून वाहतुकीचा खोळंबा होतो आहे. या ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे पादचारी व लहान वाहनधारकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या कामासाठी खणलेले खड्डे वेळेत भरले न गेल्याने पावसाच्या पाण्याने ते मोट्या तलावासारखे भरून गेले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना त्या खड्ड्यांचा अंदाज लागत नसल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. स्थानिक नागरिकांनी यासंदर्भात संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या असूनही अद्याप काहीच हालचाल झाली नाही . रस्ता कामाच्या गैरव्यवस्थापनामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. प्रशासनाने तात्काळ पावले उचलून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी जोरदार मागणी होत आहे.
