राज्यात आज मुसळधार पावसाची (Heavy Rains) शक्यता आहे. मुंबई, ठाण्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. तर पुणे, रायगड, रत्नागिरी, साताऱ्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.दरम्यान विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागान दिलाय. मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोणत्या भागात कोणता अलर्ट देण्यात आला आहे, जाणून घ्या…
मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट): रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, वर्धा, नागपूर.
जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) : पालघर, नाशिक घाटमाथा, सातारा, कोल्हापूर, अमरावती, हिंगोली, नांदेड.
विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) : जालना, परभणी, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ.
