कुंभोज येथील रिसॉर्ट वर छापा

हातकणंगले कुंभोज (ता. हातकणंगले) गावच्या हद्दीत असलेल्या अभिरूची रिसॉर्ट वर खाद्यगृहात बेकायदेशीर नृत्याविष्कार करून पार्टी करत असताना पोलीसांनी कारवाई करून रिसॉर्ट मालकासह चोविस जणावर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये आठ महिलासह सोळा पुरुषांचा समावेश आहे. याबाबतची फिर्याद जयसिंगपूर उपविभागिय पोलीस कार्यालयात प्रति नियुक्तीवर असलेले प्रकाश नारायण हंकारे यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात दिली आहे. 

आठ महिलांसह अदिल लक्ष्मण कोळी (वय ४२) रा. मलकापुर ता. कराड जि. सातारा, लाडसाब सुलतान कोकणे ( वय ४२) रा. कराड इम्तियाज मुबारक शेख ( वय ४२ ) रा. कडेगाव जि. सांगली, अभिजीत नरसिंह शिंदे ( वय ३६ ) रा. इचलकरंजी (हॉटेलमालक), जगदीश कृष्णात
पाटील (वय २४) रा. कोडोली ता. पन्हाळा जि. कोल्हापूर, अल्फाज कासीम शेख (वय २६) रा. मलकापूर ता. कराड जि. सातारा, समीर नुरमहंमद मोमीन (वय ३१) रा. कराड जि. सातारा, विजय बिरु पुजारी (वय २६) रा. मलकापुर ता. कराड जि. सातारा, अकिब लियाकत पठाण (वय २६) रा. मलकापूर ता. कराड, जि. सातारा, मजहर बदरुद्दीन पिरजादे (वय ३५) रा. मलकापूर ता. कराड, अक्षय संजय मोकाशी (वय ३१) रा. कराड ता. कराड, वाहिद बाबासो मुल्ला (वय २७) रा. विंग ता. कराड, प्रमोद तुकाराम जाधव (वय ४१) रा. मार्केटयार्ड कराड, कौस्तुभ शिवाजी यादव (वय २५ )रा. विंग ता. कराड, साहिल लियाकत मुल्ला (वय ३० ) रा. कार्वे नाका कराड ता. कराड, सातारा, अमिन रसुल शेख (वय २५) रा. मलकापूर ता. कराड जि. सातारा अशा सोळा पुरुषासह चोविस जणावर गुन्हे दाखल केले आहेत.