विट्यात 11 ऑक्टोंबरला होणार संजय गांधी निराधार योजनाची बैठक; शितल बाबर

संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्ष डॉ. शीतल अमोल बाबर यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक ही शुक्रवारी म्हणजेच 11 ऑक्टोबरला सकाळी साडेदहा वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालय विटा येथे आयोजित केलेली आहे.

या बैठकीमध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा, राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात येणार आहेत. तरी शुक्रवारी मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय येथे उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. शीतल अमोल बाबर यांनी केलेले आहे.