इचलकरंजी, महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने आज गुरूवारपासून बंद असलेली अतिक्रमण विरोधातील मोहिम सुरू केली. श्री शिवतीर्थ ते कॉ. के. एल. मलाबादे चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा बाजूला अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई केली. अतिक्रमण विरोधातील कारवाईची मोहिम सुरूच ठेवणार असल्याचे सांगण्यात आले.
शहरातील मुख्य रस्त्यासह विविध चौक तसेच विविध लहान-मोठ्या रस्त्यावरील अतिक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यामध्ये पादचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढलेले आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढतच चालल्या आहेत.महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाच्यावतीने अतिक्रमणविरोधात कारवाई केले जाते. मात्र, काही दिवसातच आहे त्या ठिकाणी अतिक्रमण करून व्यवसाय थाटल्याचे दिसून येते. त्यामुळे कारवाई कोणत्या कारणासाठी केली जाते ? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून विचारला जात आहे.
दिवसापासून बंद पडलेली अतिक्रमण निर्मुलन पथकाने आज गुरवारी श्री शिवतीर्थ ते कॉ. के. एल. मलाबादे चौकापर्यंतच्या रस्त्यावर अतिक्रमण करून लावलेले दोन खाद्यगाडे, बंद पडलेले पेयजलचे लोखंडी अँगल तसेच ७ ते ८ स्टँन्ड बोर्ड काढून जप्त करणेत आले. अतिक्रमण विरोधातील कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे अतिक्रमण निर्मुलन पथकाचे प्रमुख सुभाष आवळे यांनी सांगितले.
