फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड रिसर्च सांगोला (Sangola) महाविद्यालयातील कॉम्पुटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागात शेवटच्या वर्षातील रितेश गायकवाड आणि अनिल तोडकर यांची स्पाकॉन टेक्स्टाईल प्रा. लि . कंपनीत कॅम्पस प्लेसमेंटमधून निवड झाली असल्याची माहिती संस्थेचे सचिव डॉ. अमित रूपनर यांनी दिली.
स्पाकॉन टेक्स्टाईल प्रा. लि . कंपनी भारतातील खासगी कंपनी आहे. वस्त्र आणि कपड्यांच्या उत्पादन तसेच व्यापारामध्ये ही कंपनी कार्यरत आहे. या कंपनीत रितेश गायकवाड आणि अनिल तोडकर यांची कॅम्पस प्लेसमेंटमधून निवड झाली असून कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम पाहत आहेत. याबद्दल अध्यक्षा नीलवर्णा रूपनर , कार्यकारी संचालक दिनेश रूपनर , इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे , व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर , प्राचार्य डॉ. रवींद्र शेंडगे , उपप्राचार्य डॉ. विद्याराणी क्षीरसागर , ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. धनंजय शिवपुजे , प्रा . तानाजी धायगुडे यांनी अभिनंदन केले.
