खानापूर आटपाडी विधानसभा निवडणूक चंद्रहार पाटील……..

सांगली जिल्ह्यातील आठपैकी खानापूर व मिरज या मतदारसंघांबाबत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीत चर्चा झाली. या दोन्ही जागा शिवसेना लढेल आणि खानापुरातून चंद्रहार पाटील लढतील, अशी दिल्लीत चर्चा रंगली होती. त्याबाबत चंद्रहार पाटील म्हणाले, शिवसेना हा न्याय देणारा पक्ष आहे. मी पुन्हा लढेन. त्यावेळी मैदान कुठले असेल, याचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील. लोकसभा निवडणुकीत जे घडले त्यावर आता भाष्य करणार नाही;

परंतु यापुढची पाच वर्षे जिल्ह्यात शिवसेना चंद्रहार पाटील बांधणीवर लक्ष केंद्रित करणार आहे. त्यानंतरच पुढची लढाई लढणार आहे. त्यामुळे आताची विधानसभा निवडणूक लढविणार नाही, अशी भूमिका शिवसेना (उबाठा) गटाचे नेते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी स्पष्ट केली.

खानापूर विधानसभा निवडणूक चंद्रहार पाटील हे उद्धवसेनेतून लढविणार असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू होती. दिल्लीतही वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत याबाबत महाविकास आघाडीतून त्यांच्याच नावाची चर्चा झाली होती. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत उत्सुकता असताना चंद्रहार पाटील यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.