पंचायती राज व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान या योजनेचे पुनर्गठन करून पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानातंर्गत ग्रामपंचायतींचे दैनंदिन कामकाज सुलभ होण्यासाठी ग्रामपंचायतींना पायाभूत सुविधा घटकांतर्गत नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारत आणि नागरी सुविधा केंद्र खोल बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्यातील ११ ग्रामपंचातीना निधी मंजूर केला असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.
ग्रामपंचायतींकरिता नवीन ग्रामपंचायत (Gram Panchayat) कार्यालय इमारत बांधकाम व नागरी सुविधा केंद्र खोली या उद्दिष्टाच्या अधीन राहून ज्या ग्रामपंचातींची लोकसंख्या ३००० पेक्ष्या अधिक आहे .आणि त्यांना स्वमालकीची ग्रामपंचायत इमारत नाही, अथवा धोकादायक व मोडकळीस आलेली आहे, अशा ग्रामपंचातींचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केंद्र शासनाने सण २०२४-२५ या आर्थिक वर्षात दिल्या होत्या .सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मालवंडी , करमाळा तालुक्यातील घोटी ,झरे ,पोथरे ,माढा तालुक्यातील बेंबळे ,अरण ,सांगोला तालुक्यातील आलेगांव , पाचेगाव बु.. , वासुद ,घेरडी ,जुनोनी या ग्रामपंयचातींना इमारत बांधकामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी निधी मंजूर केला असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.
