मा. सुहासभैय्या बाबर यांच्यासाठी शिंदे शिवसेनेकडून टाईट यंत्रणा!

सध्या निवडणुकीचे वारे सर्वत्र जोर धरू लागलेले आहे. काही महिन्यातच विधानसभा निवडणूका येऊन ठेपलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाची आपापली व्ह्यूरचना सुरू झालेली आहे. सभा, मेळावे आयोजित केले जात आहेत. आज बुधवारी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र म्हणजेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे खानापूर विधानसभा मतदारसंघात दौरा होत आहे. या दौऱ्यामध्ये विटा खानापूर आटपाडी या मतदारसंघात अनेक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे.

या दौऱ्यात खासदार शिंदे यांच्या समवेत उद्योगमंत्री ना. उदय सावंत व माजी खासदार शिवसेना नेते राहुल शेवाळे हे देखील सहभागी होणार आहेत. स्व. आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुहास बाबर हे महायुतीच्या वतीने शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार म्हणून खानापूर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीला सामोरे जात आहेत.

स्व. आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या निधनानंतर प्रथमच शिवसेना नेत्यांचा या मतदारसंघात दौरा होत आहे. त्यांच्या या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दौरा होत आहे. या दौऱ्यात खासदार शिंदे हे लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते विधानसभा मतदारसंघाचा आढावा देखील घेणार आहेत. विटा येथे दुपारी तीन वाजता विटा सांगली रस्त्यावरील सुरभी लॉन येथे पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक खासदार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली आहे.

या बैठकीनंतर सायंकाळी सहा वाजता आटपाडी येथे शिवसेनेच्या वतीने आवश्यक दहीहंडी कार्यक्रमास खासदार शिंदे, मंत्री सामंत व माजी खासदार शेवाळे उपस्थित राहणार आहेत.