आष्ट्यात मयूर पाटील यांचा सत्कार

आष्टा-कोरेगावचे पहिले लोकनियुक्त माजी सरपंच मयूर पाटील यांची सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल येथील राजाराम शिक्षण संस्थेच्यावतीने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे यांच्या हस्ते सत्कार झाला. तर कोरेगावात मिरवणूक झाली.

 मयूर पाटील (Mayur Patil) टीमने स्व. मा आ. विलासरावजी शिंदे यांच्या शक्तीस्थळावर अभिवादन केले. मयूर पाटील म्हणाले, आ. जयंत पाटील, व वैभव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून संघटना  वाढीसाठी प्रयत्न करीन. वैभव शिंदे म्हणाले, आ. जयंत पाटील यांनी मयूर पाटील यांना पक्ष संघटनेमध्ये काम करण्याची संधी दिली आहे. शरदचंद्र पवार साहेब यांचे विचार, आदर्श, समाजापुढे मांडून संघटना वाढीबरोबर समाजकार्यही करावे. यावेळी कोरेगावचे सौरभ पाटील, महेश पाटील, ऋतुराज पाटील, सत्यजित पाटील, सुनील पाटील, संग्राम पाटील, संपत मगदूम अमर शेळके, अक्षय कांबळे आणि आष्ट्याचे अमर शेळके, नातू मुजावर, विजय कटारे, अभिषेक शेळके, शिवराज शिंदे – मिरजकर, रोहित शिंदे-मिरजकर, संकेत पाटील, सुरज आटुगडे, सुमित पाटील, इंद्रजीत हिरुगडे, गणेश टोमके, विजय कांबळे, दत्तराज प्रथमेश मगर, अक्षय कांबळे, वैभव माने, पवन घाटगे, सागर जगताप, खंडेराव काळोखे, पोटेसर आदी उपस्थित होते.