इचलकरंजी डीकेटीईच्या इलेक्ट्रीकल, ईएनटीसी इंजिनिअरींग व एमबीए विभागातील १५ विद्यार्थ्यांची ऍक्युटेक पॉवर सोल्युशन या नामांकीत कंपनीमध्ये निवड झाली आहे. ऍक्युटेक पॉवर सोलुशन ही युपीएस पॉवर बॅकअप मधील नामांकित कंपनी आहे. ऍक्युटेक पॉवर सोल्युशन या कंपनीतील तज्ञ मंडळींनी डीकेटीईस भेट दिली व इलेक्ट्रीकल विभागातून ४, ईएनटीसी इंजिनिअरींग तून २ व एमबीए विभागातील ९ विद्यार्थ्यांची असे एकूण १५ विद्यार्थ्यांची इंटरव्हयुवद्वारे उत्तम पॅकेजेवरती निवड झाली आहे.
या यशाबददल डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टींनी शुभेच्छा दिल्या. ऍक्युटेक कंपनीमार्फत डॉ देवेंद्र बोरा, रुचिका नाईक, सुनिल जाधव, दिपक पवार,प्रमोद पोटजाळे, रक्षदा कांबळे व संदीप घावरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. डॉ. देवेंद्र बोरा यांच्या अथक परिश्रमामुळे डीकेटीई आणि ऍक्युटेक यांच्यात सामंजस्य करार झाला. विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. सौ. एल. एस. अडमुठे, विभागप्रमुख डॉ एस. ए. पाटील, प्रा. डॉ. आर. एन. पाटील, पी. एस. जाधव, टीपीओ जी. एस. जोशी व प्रा. ए. एस. गणपते यांचे मार्गदर्शन लाभले.
