बांधकाम कामगारांना पूर्वीप्रमाणे भांडी वाटप करण्याची मागणी

इचलकरंजी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये अत्यावश्यक संच (पेटी), गृह उपयोगी वस्तू (भांडी) वाटप गेली दोन | महिने पोर्टलच्या नावाखाली बंद आहे ते पुर्वीप्रमाणे सुरू करा, या मागणीसाठी सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना शिष्टमंडळ | भेटून निवेदन देण्यात आले.

 अत्यावश्यक संच (पेटी), गृह उपयोगी वस्तू (भांडी ) बाटपासाठी पोर्टल सुरू केले होते पण ते अचानक बंद केले. त्यापासून अद्याप सुरू नाही. पोर्टलमध्ये ठराविकच अर्ज दाखल केले जातात त्यामुळे वरील  वस्तू वेळेत मिळणे कठीण आहे. म्हणून पूर्वी ज्याप्रमाणे वाटप सुरू होते. तसेच वाटप करा, थम करण्याची प्रक्रिया मंद गतीने सुरू आहे त्याची संख्या वाढवा किंवा हातकणंगले इचलकरंजी शिरोळ करिता नवीन तीन सुविधा केंद्रांची स्थापना करा आदी मागण्या या निवेदनातून करण्यात | आल्या आहेत. यावेळी सदरच्या मागण्या लवकरात लवकर मंजूर करू व याचा वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करू, असे आश्वासन सहायक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांनी दिले. या शिष्टमंडळात कॉ. आनंदा गुरव, मदन मुरगुडे, नूरमहमद बेळकुडे, रमेश खोत आदी उपस्थित होते.