सांगोला(sangola) महाराष्ट्र सरकार विकास महामंडळ आणि एनसीडीसी यांच्या संयुक्त विद्यमानाने केंद्र सरकारच्या दहा हजार शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना कार्यक्रमांतर्गत स्थापन झालेल्या लक्ष्मीनगर येथील लक्ष्मी शेतकरी उत्पादक संस्था मर्यादित महूद यांच्या वतीने कंपनीतील शेतकरी सभासदांसाठी कृषी सेवा केंद्र सुरु केले आहे.
या कृषी सेवा केंद्रासाठी महाराष्ट्र सरकार विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी मंगेश तिटकारे , तसेच भास्कर पाटील, बळवंत धुमाळ सादिक मनेरी आणि एनसीडीसी चे वरिष्ठ अधिकारी तसेच अषिश शिरसाट आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या कृषी सेवा केंद्राचे फायदे म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी सोबत जोडलेले शेतकरी सभासदांना योग्य दरात आणि योग्य वेळी खते औषधे आणि बी बियाणांचा पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच
या कृषी सेवा केंद्रामार्फत शेतकरी सभासदांना पीक निहाय मोफत कृषी सल्ला दिला जाणार आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कृषी सेवा केंद्राचा लाभ घ्यावा संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
