व्यंकटेश्वराच्या खेळाडूंची राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड

कोल्हापूर जिल्हा योगासन स्पोर्टस् असोसिएशन यांचेमार्फत  इचलकरंजी येथे जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात  आले होते. या स्पर्धेत व्यंकटेश्वरा इंग्लिश स्कूल, कबनूर येथील  खेळाडूंनी विविध प्रकारात यश संपादन केले.

 यामध्ये अनुक्रमे सार्थक कुपटे (प्रथम क्रमांक), अथर्व मोकाशी  ( प्रथम क्रमांक), त्रिशा धूत ( प्रथम क्रमांक), क्रिश पटेल (द्वितीय क्रमांक), मनुश्री शर्मा, (तृतीय क्रमांक) तसेच सदर स्पर्धेतून शाळेतील   सार्थक कुपटे, अथर्व मोकाशी व त्रीशा धूत या खेळाडूंची संगमनेर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली. या सर्व  खेळाडूंचे स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. स्मिता बेडक्याळे यांनी अभिनंदन  केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन दीपक राठी, व्हा. चेअरमन  रामजी मुंदडा, सेक्रेटरी कमलेश राठी, ट्रेझर महेश भुतडा, राजेश  लोया यांनी कौतुक केले. सदर खेळाडूंना योगाशिक्षिका सौ. स्नेहा  परीट, क्रीडाशिक्षक अमोल थोरवत, सुधाकर वायदंडे, आर. बी.  पाटील व सुजाता निंबाळकर यांचे मार्गदर्शन लाभले.