रुईमध्ये बैल सजावट स्पर्धा उत्साहात संपन्न! स्वप्नील भिसे यांचा बैल प्रथम

इचलकरंजी शहरासह परिसरामध्ये कर्नाटकी बेंदूर अगदी उत्साहाने साजरा केला जातो. इचलकरंजीमध्ये कर्नाटकी बेंदूर निमित्त बैलगाडा शर्यती, लाकूड ओढण्याच्या शर्यती अशा अनेक प्रकारच्या शर्यती घेतल्या गेल्या आणि कर्नाटकी बेंदूर हा सण खूपच उत्साहात आणि आनंदात साजरा केला गेला.

हातकणंगले तालुक्यातील रुई या गावात कर्नाटकी बेंदूर निमित्त बैल सजावटी स्पर्धा घेतल्या जातात आणि सालाबाद प्रमाणे याही वर्षी रुईमध्ये बैल सजावट स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडल्या. ही स्पर्धा कुमार विद्यामंदिर येथे आयोजित केली होती आणि स्पर्धा पाहण्यासाठी शौकिनांनी मोठी गर्दी देखील केलेली होती. बैल सजावट स्पर्धेमध्ये स्वप्नील भिसे यांचा बैल प्रथम तर बाबासो कागले यांचा बैल द्वितीय क्रमांक तर जीवन नाईक यांच्या बैलाला तृतीय क्रमांक मिळाला.