या शेतकऱ्यांना २००० ऐवजी मिळत आहेत ७०००, सरकारने दिली मोठी भेट

यंदा केंद्र सरकारने सुमारे २०,५०० कोटी रुपये देशभरातील ९.७ कोटी शेतकऱ्यांना (Farmers) प्रत्येकी २००० हजार रुपयांच्या हप्त्यात खात्यात जमा केली आहे. परंतू एक राज्य असे आहे जेथे शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ २००० रुपये नाहीत तर ७००० रक्कम स्ट्रान्सफर झाली आहे.

आंध्रातील शेतकऱ्यांसाठी हा दिवस खास आहे. आंध्रप्रदेशातील राज्य सरकारने केंद्राच्या पीएम किसान योजने सोबत स्वत:ची योजना जोडली आहे. तिचे नाव अन्नदाता सुखीभव पीएम किसान योजना. या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक २०,००० रुपये देण्याचे वचन दिले आहे. या अंतर्गत पहिला हप्त्याच्या रुपात शेतकऱ्यांना ५००० रुपये राज्य सरकारतर्फे तर २००० रुपये केंद्र सरकारमार्फत मिळाले आहेत. या प्रकारे आंध्रप्रदेशात ४६,८५,८३८ शेतकऱ्यांच्या खात्यात ७ हजार रुपये पोहचले आहेत.

आंध्रचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू यांनी या योजनेची घोषणा निवडणूक जाहीरनाम्यात केली होती. सत्तेत आल्यानंतर या योजनेस लागू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी ही योजना गरजेची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे पाऊल शेतकऱ्यांना आत्मनिर्भर आणि सबल करेल असेही त्यांनी म्हटले आहे.

तुमच्या खात्यात जर पैसे आले नसतील काय करावे ?
जर तुम्ही पीएम किसानचे लाभार्थी आहात आणि आता पर्यंत तुमच्या खात्यात २००० रुपये आले नाही तर काही बाबी तपासा

तुमचा PM Kisan रजिस्ट्रेशन नंबर वा आधार नंबर घेऊन pmkisan.gov.in वेबसाईट वर लॉग इन करा

तेथे Beneficiary Status सेक्शनमध्ये जाऊन स्थिती तपासा

जर काही त्रुटी असेल तर स्थानिक कृषी अधिकारी वा CSC केंद्रावर संपर्क करा