कन्हेरगावात (Kanhergaon) येथील अनिल मधुकर केदार यांच्या शेतातील काढणीस आलेल्या चार लाख रुपये किमतीचे तीन टन डाळिंब पिकाची चोरी झाली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री सुमारास घडली आहे.
कन्हेरगाव येथील अनिल मधुकर केदार यांनी त्यांच्या शेतात एक एकर डाळिंब पिकाची काही वर्षांपूर्वी लागवड केली होती. यंदा हे पीक जोमदार आले होते. सहा ते सात टन डाळिंब विक्रीसाठी येईल असा अंदाज होता .परंतु शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरटयांनी डाळिंब पिकावर डल्ला मारला . या घटनेने शेतकरी हवालदिल झाला आहे. सुमारे चार लाख रुपयेपेक्षा अधिक नुकसान अनिल केदार यांचे झाले आहे.
सध्या डाळिंब पिकास सोन्याचा भाव आला आहे, यामुळे पीक चोरी झाल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढावले आहे. मात्र आद्यापपर्यंत पोलिसांनी त्यांचा गुन्हा दाखल करून घेतलेला नाही यामुळे शेतकऱ्यातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा , अशी मागणी कन्हेरगावच्या शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
