राजारामबापू इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलाजी या एम्पॉवर्ड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी मिळून २०१८ मध्ये सुरु केलेल्या टीजिपी बायोप्लास्टिकस या स्टार्टअपला महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजि कमिशन यांच्या कॉलॅबोरेटीव्ह प्रोजेक्ट्स बिटवीन इन्स्टिट्यूट्स अँड इंडस्ट्री फॉर टेक्नॉलॉजिकल ऍडॉप्शन या स्कीम अंतर्गत घर आणि औद्योगिकदृष्ट्या कंपोस्टेबल प्लास्टिकच्या उत्पादनासाठी औद्योगिक सुसूत्रीकरण या प्रकल्पांतर्गत २.५२ कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचे आरआयटीचे डायरेक्टर डॉ पी व्ही कडोले यांनी सांगितले.
प्रा. महेश पिसाळ यांच्या पाच वर्षाच्या संशोधन कार्याचे फलित असून २०१८ पासून सुरु असलेल्या संशोधनातूनच कंपोस्टेबल प्लॅस्टिकची निर्मिती झाल्याचे आणि यापूर्वीही महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजि कमिशन यांचेकडून हा प्रकल्प सुरु करण्यासाठी ५३.६२ लाखाचा निधी मिळाला होता. हे स्टार्टअप आता जॉन डियर, विलो, किर्लोस्कर आणि आदित्य बिर्ला यासारख्या नामवंत कंपन्यांना कंपोस्टेबल प्लास्टिक आणि त्यासम उत्पादनांचा पुरवठा करत आहे. यावेळी या स्टार्टअपचे मार्गदर्शक प्रा महेश पिसाळ यांनी सांगितले कि, येणाऱ्या काळात आरआयटीचा हा स्टार्टअप प्रकल्प हा अभियांत्रिकी विद्यार्थी, नव उद्योजकांना आणि संशोधकांना नवीन प्रेरणा देणारा ठरणार आहे. यासाठी आरआयटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष भगतसिंह पाटील आरआयटीच्या नियामक मंडळाचे सदस्य जयंत पाटील कासेगाव एज्युकेशन सोसायटी चे सचिव आर डी सावंत आणि आरआयटीचे (RIT) डायरेक्टर पी. व्ही कडोले यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.
