सरकारी बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. इंडियन बँकेत (Indian Bank) विविध पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत १ हजार ५०० पदे भरली जाणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवार इंडियन बँकेचे अधिकृत संकेतस्थळ www.indianbank.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज भरू शकतात. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ७ ऑगस्ट पर्यंत देण्यात आली आहे.
इंडियन बँकेने ‘अप्रेंटिस’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. इंडियन बँक रिक्रूटमेंट बोर्डाने एकूण 1500 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. उमेदवारांना विनंती आहे की अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. या भरती प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कुठेही नोकरीचे ठिकाण दिले जाऊ शकते.
उमेदवाराकडे कोणत्याही विषयात पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, 01 एप्रिल 2021 रोजी किंवा त्यानंतर पदवी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे वय किमान २० वर्षे असावे, तर कमाल वयोमर्यादा २८ वर्षापर्यंत देण्यात आली आहे. जनरल, ओबीसी तसेच ईब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवरांना ८०० रुपये अधिक जीएसटी एवढा परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे. तर एसी, एसी आणि अपंग उमेदवारांना १७५ रुपये अधिक जीएसटी एवढा शुल्क आकरण्यात येणार आहे.
