राज्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना बँका, वित्त संस्थांकडून लादलेली अन्यायी कर्जे आणि सावकारांच्या विरोधात उद्या सोमवार, दि. २३ रोजी मुंबईतील मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जय जवान, जय किसान संघटनेचे संघटक आनंदराव सरनाईक यांनी दिली.
ते म्हणाले, मुंबईत सोमवारी दुपारी मोर्चा काढून धरणे आंदोलन केले जाणार आहे. सर्वसामान्य शेतकरी,छोटे योजक, व्यावसायिक बँका आणि सावकारांच्या कर्जाच्या विळख्यात अडकून त्रस्त झाले आहेत. बँका, वित्तीय संस्थांच्या कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशा मागण्या मुख्यमंत्र एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचे सरनाईक यांनी
सांगितले