आटपाडी(Aatpadi) पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात कारवाई करत गुजरातहून आलेल्या संशयितास ताब्यात घेत मोठा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सनी पवार ऊर्फ सन्निदेव अर्जुन शिंदे(वय २६, रा. करगणी, ता. आटपाडी ) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे २ लाख २२ हजार ७२० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामध्ये बारा बोअरची रायफल, आठ काडतुसे, १ तोळ्यांचे सोन्याचे गंठण , १ सोन्याची चैन ,१५ हजार रुपयांची रोकड , तसेच महिलांच्या वापरातील चांदीचे दागिने आणि फुलांची सजावट यांचा समावेश आहे.
पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून अट्टल गुन्हेगार सनी पवार करगणी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ५ ऑगस्टरोजी सायंकाळी सापळा रचून हि कारवाई केली. पोलीस निरीक्षक विनय बहीर , उपनिरिक्षक सागर खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दादासाहेब ठोंबरे , अर्जुन बोडखे, सचिन सुर्वे, विष्णू भोईनवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. गुन्ह्यात वापरलेला मुद्देदेमाल हा महिलांना आकर्षित करण्यासाठी वापरण्यात येत होता, असा संशय आहे.
