आटपाडी(Atpadi )घाणंद येथे दोन कुटुंबामध्ये शेतजमिनीच्या मालकी व वापर हक्कावरून मोठा वाद झाला. या वादातून(dispute) ६ ऑगस्टरोजी सायंकाळच्या सुमारास हाणामारी झाली. याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यात दोन परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
आटपाडी पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार , बबन शिंदे (वय ६५ रा. घाणंद ) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे , ६ ऑगस्टरोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ते आपल्या शेतात असताना, गावातील पांडुरंग जयसिंग शिंदे,नारायण शिंदे , सर्जेराव ,आणि हेमलता शिंदे यांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली . या घटनेत बबन शिंदे याना दुखापत झाली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच सर्जेराव जयसिंग शिंदे (वय ४५, रा घाणंद ) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार ६ ऑगस्टरोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आर. के. मंगल कार्यालयाच्या बाजूच्या पडीक शेतजमिनीवर बबन शिंदे यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या शेळ्या त्यांच्या भाडेपट्टीतील शेतात सोडल्याने वाद निर्माण झाला. फिर्यादीने विचारणा करताच, सागर बबन शिंदे आणि संदेश बबन शिंदे यांनी शिवीगाळ करत हल्ला चढवला. सागर शिंदेने कुऱ्हाडीने सर्जेराव यांच्या डाव्या पायाच्या अंगठ्यावर वार केला, त्यानंतर सर्जेराव घरी गेले आणि आपली पत्नी, मुलगा व मुलगी यांना घेऊन घटनास्थळी गेले. त्यावेळी छाया बबन शिंदेने
कानशिलात मारले , संदेशने सर्जेराव यांच्या पत्नीच्या पाठीवर आणि मुलगी सोनालीच्या डोक्यावर काठीने प्रहार केला. या घटनेत तीनजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
