हातकणंगलेच्या सेवेत नव्या लालपरी दाखल

इचलकरंजी आगारास बसेसची कमतरता भासत होती. यापूर्वी आम. डॉ. राहुल आवाडे यांच्या माध्यमातून पाच लाल परी देण्यात आलेल्या आहेत. आता आम. अशोकराव माने यांच्या विशेष प्रयत्नाने आणखीन पाच बसेस इचलकरंजी आगाराला मिळाल्या आहेत. पेठवडगाव, हातकणंगले, इचलकरंजी आदी मार्गांवर या बसेस धावणार आहेत. अशी माहिती आगार व्यवस्थापक सागर पाटील यांनी दिली.

 शनिवारी सकाळी नऊ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत लालपरीचे पूजन करण्यात आले. बसेसचे पूजन झाल्यानंतर आम. अशोकराव माने आणि अरुण इंगवले यांच्यासह उपस्थित नागरिकांनी बसमधून प्रवास करत आळते येथील रेणुका देवीचे दर्शन घेतले.

 इचलकरंजी आगारासाठी शक्य तितक्या सोयी सुविधा तातडीने सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आम. माने यांनी सांगितले तर पेठवडगाव-मिरज अशी थेट बस सेवा सुरू करण्याची सूचना अरुण इंगवले यांनी केली. मान्यवरांचे स्वागत आगार व्यवस्थापक सागर पाटील यांनी केले..

यावेळी माजी जि. प. सदस्य प्रसाद खोबरे, राजू इंगवले, अण्णासाहेब चौगुले, अमर इंगवले, शितल हावळे, रमजान मुजावर, अमित पाटील, अनिल कांबळे, सुहास राजमाने, विजय निंबाळकर, आप्पा पाटील आदींसह प्रवासी उपस्थित होते.