सह्याद्री फार्मसी कॉलेजमध्ये नॅक क्रेडीटेशन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

सांगोला : सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, मेथवडे या महाविद्यालयात अॅक्रेडीटेशन स्टँडर्ड्स (Pharmacy) अँड करायटेरिया फॉर क्वालिटी एन्हान्समेंट याविषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. हि कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेचे उदघाटन प्रमुख मार्गदर्शक प्रा.अनिल निकम, हेड- जनरल सायन्स अँड इंजिनीरिंग, सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, पंढरपूर, डॉ. श्याम कुलकर्णी, हेड मेकॅनिकल इंजिनीरिंग डिपार्टमेंट सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, पंढरपूर, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीपकुमार इंगवले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोजकुमार पाटील, प्रा. एस. एस. काळे, महाविद्यालय नॅक विभागप्रमुख डॉ. ए. एम. तांबोळी यांच्या हस्ते व सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत सरस्वती मातेच्या फोटोचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाले.

या कार्यशाळेत प्रा. अनिल निकम व डॉ.श्याम कुलकर्णी यांनी सुरवातीस नॅक क्रेडीटेशन महत्व, पात्रता व त्याचे गुणात्मक (Pharmacy) फायदे सांगितले. GPS Map Camera राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद संस्थानांच्या गुणवत्ता दर्जाला समजण्यासाठी महाविद्यालय, विश्वविद्यालय आणि इतर मान्यताप्राप्त विद्यालय त्यांच्या उच्च स्तरावरील शिक्षण मूल्यांकन आणि मान्यताची व्यवस्था करते. नॅक शैक्षणिक प्रक्रियांचे आणि त्यांच्या परिणामांचे अनुसंधान, सुविधा आर्थिक सुदृढता आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधाच्या संबंधित संस्थांच्या कार्यासंबंधी गुणवत्तेसाठी शैक्षणिक संस्थांना मूल्यांकन करत असते.

या मूल्यांकन पद्धतीत महाविद्यालयाच्या वर्गखोल्या (डिजिटल क्लासरूम ), शैक्षणिक गुणवत्ता, उपलब्ध साधनसामग्री, विविध मूल्यांकन मॉडेल्समधील मुद्दे, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदी आदी विविध मुद्यांचा समावेश आहे. या सर्व मुद्द्यांचे मुद्देनिहाय मूल्यांकन करून सापेक्ष प्रतवारी प्रणाली (रिलेटिव्ह ग्रेडिंग सिस्टम) करून मूल्यांकन दिले जाते असे सांगितले . नॅक क्रेडीटेशन विषयी विस्तृत माहिती सादर करून सरानी नॅक मध्ये असणारे विविध करायटेरिया व त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स, कागदपत्रे या विष उदाहरणासहित माहिती दिली. यावेळी प्राध्यपकांनी उपस्थित केलेल्या सर्व शंका व प्रश्नाचे सरानी समाधानकार उत्तरे देऊन निरसन केले. या कार्यशाळेचे सूत्रसंचलन डॉ. एन. ए. तांबोळी, पाहुण्यांची ओळख डॉ. एम. जी. शिंदे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. एस.पी. जोकार यांनी केले.