संत बाळूमामा हॉस्पिटलमुळे रुग्णांची गैरसोय दर होईल

 पट्टणकोडोली, पट्टणकोडोलीसारख्या ग्रामीण भागात सर्व सोयीनियुक्त मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची नितांत गरज होती. ती श्री संत बाळूमामा हॉस्पिटलमुळे पूर्णत्वास आली आहे.

 ग्रामीण भागातील होणारी रुग्णांची धावपळ व गैरसोय थांबण्यास नक्की मदत होईल. यासाठी शासन स्तरावर आरोग्य विभागाकडून कोणत्याही प्रकारची लागेल ती मदत करेन, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी दिली.

 पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील श्री संत बाळूमामा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उदघाटनप्रसंगी उदघाटक या नात्याने ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खास धैर्यशील माने, आम.डॉ.अशोकराव माने, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, प्रभारी सरपंच नम्रता माळी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी किसन तिरपणकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी खास. धैर्यशील माने, आम, डॉ. अशोकराव माने, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

 यावेळी डॉ. प्रणव थोरात, डॉ. जयपाल शिंगे, डॉ. संतोष शिनगारे, डॉ. अभिजीत सुतार, ग्रामविकास अधिकारी टी. वाय. हणमंते यांच्यासह अन्य मान्यवर, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर्स व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमरसिंह रजपूत यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले.