सोने , गाडीसाठी विवाहितेचा छळ , नवऱ्यासह चौघावर गुन्हा दाखल

माहेरकडून खर्चासाठी पैसे , सोने व गाडी घेऊन ये , असे म्हणत शिवीगाळ करून मानसिक छळ केल्याप्रकरणी पीडित महिलेने सासू, सासरा , दीर यांच्यासह पतीवर गुन्हा दाखल केला. याबाबत पीडित महिलेने सासरच्या चौघाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतची हकीकत अशी की , फेब्रुवारी २०२३ ते १ जुलै २०२५ पर्यंत फिर्यादीच्या सासरचे लोक नवरा नंदकिशोर प्रकाश साळवे , सासू शालिनी प्रकाश साळवे , सासरा प्रकाश गबाजी साळवे , दीर विशाल प्रकाश साळवे (रा- साकोरी टिबल्ये , ता. जुन्नर , जि .पुणे ) यांनी फिर्यादी महिलेस आम्हाला तू घरी खर्चासाठी पैसे दे, तुझे माहेरकडून सोने आणि गाडी घेऊन ये, असे म्हणून तगादा लावला. तसेच घरगुती कारणावरून फिर्यादीस वेळोवेळी शिवीगाळ , दमदाटी करून हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण करून फिर्यादीस शारीरिक व मानसिक छळ केला. याबाबत फिर्यादी महिलेने वरील चौघाविरुद्ध सांगोला पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पो. ना . लेंगरे हे करीत आहेत.