पती-पत्नीचा वादात ; आईने दोन वर्षीय चिमुकलीसह स्वत:च्या गळ्यालाही दोर लावला

बीडच्या गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाणे हद्दीतून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. पती-पत्नीच्या वादात आईने दोन वर्षीय मुलीचा दोरीने गळा आवळून स्वतः आत्महत्या केलीय. हि घटना गेवराई तालुक्यातील मालेगाव मजरा या गावात उघडकीस आली असून मायलेकीच्या मृत्यूने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोबतच या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.

दोघांचाही दुसरा विवाह, आईने चिमुकलीसह स्वत:ला संपवलं मिळालेल्या माहितीनुसार, अंकिता यांचे तीन वर्षांपूर्वी मालेगाव येथील बळीराम यांच्याशी विवाह झाला. मात्र सतत पती-पत्नीत होणाऱ्या वादामुळे त्या त्रस्त होत्या. अखेर सततच्या त्रासाला कंटाळून अंकिताने आत्महत्येच पाऊल उचलत आपलं जीवन संपवलंय. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आलीय. या वादात मात्र एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. बळीराम आणि अंकिता या दोघांचाही हा दुसरा विवाह होता. दरम्यान या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून काही घातपात आहे का? या दृष्टीने पोलीस तपास करत आहे.