आष्ट्यात उद्या दहीहंडीचे आयोजनपहिल्यांदाच होणार महिला संघ सहभागी

आष्टा शहर व पंचक्रोशीत सव्वालाखाची व शिंदेप्रेमी नावाने परिचित असणारी मा. आ. विलासराव शिंदे दहीहंडी आज गुरुवार ता. २१ ऑगस्ट रोजी होत, कारखान्याचे चेअरमन प्रतीक आहे. या मानाच्या दहीहंडीसाठी प्रथम विजेत्या संघास १ लाख २५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे, प्रमुख आकर्षण सिने अभिनेत्री श्रुती मराठे हे असणार आहे. अशी माहिती युवा नेते वरदराज वैभव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अमोल पाटील, सुहास रुगे, दीपक थोटे, सागर जगताप, गणेश टोमके, भूपाल खोत, शिवराज शिंदे, रोहित मिरजकर, प्रमुख उपस्थित होते. 

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा आष्टा शहर विकास आघाडीचे पालक नेते वैभव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव होतं आहे. आम. जयंत पाटील कारखान्याचे चेअरमन प्रतीक पाटील, यांच्यासह राजकीय, सहकार, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.