आजकाल एसीशिवाय राहणं अनेकांना कठीण झालं आहे. पण एसीचा (AC) जास्त वापर केल्यास शरीरावर काही दुष्परिणाम होतात हे कमी लोकांना माहीत असतं. एसीच्या थंड हवेमुळे त्वचेतलं नैसर्गिक ओलसरपण कमी होतं. त्यामुळे त्वचा कोरडी पडते, खाज सुटते आणि वेळेआधी सुरकुत्या येऊ शकतात.जास्त वेळ एसीत बसल्याने डोळ्यांत जळजळ, कोरडेपणा आणि पाणी येणं यासारख्या तक्रारी वाढतात. अचानक थंड वातावरणामुळे सर्दी, खोकला, शिंक या समस्या होऊ शकतात.ज्यांना अॅलर्जी आहे त्यांना यातून जास्त त्रास होतो. जास्त वेळ थंड वातावरणात बसल्याने स्नायूंमध्ये stiffness (आकडणे) येतं, त्यामुळे मानदुखी, पाठदुखी वाढू शकते. थंड वातावरणात दीर्घकाळ राहिल्यास रक्ताभिसरणावर परिणाम होतो आणि BP असलेल्या लोकांना त्रास होऊ शकतो. एसीत नेहमी राहणाऱ्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू कमी होते, ज्यामुळे लहान आजार पटकन होऊ शकतात.
एसीमुळे वाढते आजारपण? जाणून घ्या सत्य
