इस्लामपूर नगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर

उरूण -इस्लामपूर (Islampur) नगरपालिकेची प्रभाग रचना सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. एका प्रभागाची वाढ होत १५ प्रभाग झाले आहेत. या प्रभागातून ३० नगरसेवक अशी संख्या झाली आहे. पालिका सभागृहात प्रभाग रचनेचा नकाशा नागरिकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला आहे. या प्रभाग रचनेवर हरकती व सूचना नोंदविण्यासाठी रविवारी दि . ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी दिली. २०२२ च्या प्रभाग रचनेप्रमाणेच थोडा बदल करत आताची प्रभाग रचना करण्यात आली आहे. यामध्ये काही प्रभागाचे क्रमांक बदलत चार ते साडेचार हजार लोकसंख्येचा एक प्रभात तयार करण्यात आला आहे या मुदतीत आलेल्या हरकती , सूचनांचा विचार व योग्य ते बदल करून अंतिम प्रभाग रचना शासनाकडे मंजुरीसाठी पाठवली जाणार आहे. या प्रभाग रचनेस मंजुरी दिल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो.