आम.जयंत पाटील यांच्याकडून पूरस्थितीची पाहणी            

सतत पडणारा पाऊस आणि कोयनेतून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कृष्णा नदीने पाण्याचे पात्र सोडले आहे. त्यामुळे कृष्णा नदीकाठच्या गावात पूरसदृश्य परिस्थिती, आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत माजी मंत्री आ. जयंतराव पाटील (Jayant Patil) यांनी थोडीही उसंत न कृष्णा नदीकाठच्या गावांना भेटी देत,पुराची पाहणी करीत ग्रामस्थांना दिलासा दिला. ‘भिऊ नका, मात्र सावध रहा. काही लागले,तर मी आहे, या शब्दात त्यांनी लोकांना धीर दिला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क करीत आवश्यक ती खबरदारी घेत योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. 

आ. जयंतराव पाटील यांनी वाळवा तालुक्यातील कृष्णा नदीकाठच्या ताकारी, साटपेवाडी, गौंडवाडी, रेठरेहरणाक्ष, दुधारी, बिचुद, शिरटे, कोळे, नरसिंहपूर, बहे, तांबवे, बोरगाव, जुनेखेड, वाळवा, शिरगाव व मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज या गावांना भेटी दिल्या. त्यांनी कार्यकर्ते व ग्रामस्थांशी संवाद साधत त्या-त्या गावातील पूर परिस्थितीची माहिती घेतली आणि प्रत्यक्ष पाहणी केली. 

वाळवा तालुक्यात तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम होता. कोयना व चांदोली धरणातून विसर्ग वाढवल्याने वारणा, कृष्णा नद्यांचे पाणी पात्राबाहेर होते. प्रशासनाने नदीकाठच्या गावां सतर्कतेचा इशारा दिला आहे.