पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) एका मास्क मॅनची दहशत पाहायला मिळाली. हा मास्क मॅन दिवसाउजेडी पिंपरी चिंचवड येथे हातात चाकू घेऊन फिरताना दिसला. शहरातील लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी या मास्क मॅनने धारधार चाकू हातात घेतला आहे.
पिंपरी चिंचवड शहरात मास्क मॅन ची दहशत पाहायला मिळत आहे. भर रस्त्यात , भर दिवसा हातात धारदार चाकू घेऊन मास्क मॅन शहरात वावरताना पाहायला मिळत आहे. निगडी येथील बजाज ऑटोमोबाईल समोरील एचपी पेट्रोल पंपाजवळ काही वेळापूर्वी मास्क मॅन हातात धारदार चाकू घेऊन रस्ता क्रॉस करत असताना दिसत आहे. त्याने कोणाला मारण्यासाठी हा चाकू हातात घेतला आहे की लोकांना दहशत निर्माण करण्यासाठी हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मास्क मॅन गुन्हेगाराने चेहऱ्यावर मास्क घालून आपली ओळख लपविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच हातात धारदार चाकू घेऊन वावरत असल्याने रस्त्या वरून ये जा करणाऱ्या नागरिकांच्या मनामध्ये मास्क मॅनची मोठी दहशत निर्माण झाली आहे.आता या हातात चाकू घेऊन पिंपरी चिंचवड शहरात वावरणाऱ्या मास्क मॅन च्या मुसक्या पिंपरी चिंचवड पोलीस कधी आवळणार. याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
