इचलकरंजीत उद्यापासून १०८ कुंडीय श्री गणपती महायज्ञ! भरगच्च धार्मिक कार्यक्रम


पंचगंगा वरदविनायक मंदीर येथे मंगळवार दि. २ जानेवारी २०२४ ते १० जानेवारी २०२४ पर्यंत श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती आणि श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळ इचलकरंजी यांच्या वतीने १०८ कुंडीय श्री गणपती महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. जनकल्याण, सुख-शांती व मनोइच्छा पूर्ण होणेसाठी हा महायज्ञ संपन्न होत आहे. अशी माहिती पंचगंगा वरद विनायक मंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी, सनातन ज्ञानपीठ समितीचे अध्यक्ष गोविंद बजाज यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बुधवार दि. १० जानेवारी रोजी संत संमेलनाने व यज्ञाच्या पूर्णाहूतीने कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा भाविक, भक्तांसह नागरिकांनी आणि गणेशोत्सव मंडळांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री. स्वामी व बजाज यांनी केले आहे.