आले विटा (vita)शहरापासून जवळच असलेल्या कराज ओढा पुलाजवळ इनोव्हा कारचा अपघात झाला. या अपघातात ३२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा २३ वर्षीय तरुण गंभीर(injured) जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , रोहित वायदंडे यांच्या मालकीची इनोव्हा कार (एमेच १० डीएक्स ६५६५ ) कराज ओढा पुलाजवळ चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याकडेला जाऊन अनेक वेळा पलटी झाली.या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातातील मयत तरुणाचे नाव इंद्रजीत विजय गोतपागार (वय ३२,रा. सरसिंगे ) असे आहे तर , गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव सुशांत महेंद्र कांबळे (वय २३,रा. सरसिंगे ) आहे. अपघातामुळे दोन्ही तरुण गाडीतून बाहेर फेकले गेले. इंद्रजीत गोतपागार यांचा जागीच मृत्यू झाला असून, सुशांत कांबळे याला प्रकृती गंभीर असल्याने सांगली येथील रुग्णालयात हलवण्यातआहे.
