महाविकास आघाडीच्या प्रचार सभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे स्टार प्रचारक आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे विटा येथे आले होते. यावेळी त्यांच्या हेलिकॅप्टर आणि बॅगेची तपासणी करण्यात आली.याबाबत खानापूर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विक्रमसिंह बांदल म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या आचार संहितेतील गाईडलाईनुसार पथक क्रमांक एकने ही तपासणी केली. हेलिकॉप्टरमध्ये जाऊन आतील आणि संबंधितांच्या बॅगा तपासण्याची आम्हाला वरून ऑर्डस आल्या आहेत.
मात्र, खासदार डॉ. कोल्हे यांच्याजवळ पैसे अगर काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही, असे उत्तर दिले. म्हणाले, आज विट्यात आल्या आल्या माझी बॅग तपासण्यात आली. बॅगेतले कपडेसुद्धा खाली – वर करून पाहण्यात आले. मला तपासल्याबद्दल काही म्हणायचे नाही. तो त्यांना अधिकार आहे. पण धनुष्यबाणाचे मोठे नेते विट्यात आले तर त्यांच्या बॅगा तपासण्याची तुमची हिंमत आहे का ? असा जाहीर सवाल डॉ. कोल्हे यांनी केला