शिरोलीत घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन

हेरले,  शिरोली ग्रामपंचायतीने मूर्ती दान करण्यास केलेल्या आवाहनाला पुलाची शिरोलीत चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच सार्वजनिक व घरगुती गणपती विसर्जन(Immersion) बिरदेव गाव तलावात रात्री उशिरापर्यंत करण्यात आले. 

शिरोलीच्या सरपंच सौ. पद्मजा करपे, उपसरपंच विजय जाधव व ग्रामपंचायत अधिकारी सौ. गिता कोळी यांनी गावातील तरुण मंडळ व ग्रामस्थांना मूर्ती दान करण्याचे आवाहन प्रशासनाच्या आदेशानुसार केले होते. त्या आवाहनास चांगला प्रतिसाद मिळाला. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सुमारे अडीचशे मूर्ती दान करण्यात आल्या.

 
शिरोली ग्रामपंचायतीच्या वतीने बिरदेव तलावात तलाव्याच्या दोन्ही बाजूला गणपती मूर्ती विसर्जन (Immersion)करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या दोन टीम तैनात केल्या होत्या. हे सर्व कर्मचारी बॅरेलच्या वरती बांधण्यात आलेल्या तरफेवर गणेश मूर्ती ठेवून खोल पाण्यात जाऊन मूर्तीचे विसर्जन करीत होते. तर झाडू कामगार गौरीचे निर्माल्य गोळा करून ट्रॉली व घंटागाडीत भरण्याचे काम करीत होते.

 एकूणच गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी माजी उपसरपंच कृष्णात करपे, बाळासाहेब पाटील, दीपक यादव, उपसरपंच विजय जाधव, योगेश खवरे, महंमद महात, संपत संकपाळ तसेच शिरोली पोलीस ठाण्याचे सपोनी सुनील गायकवाड, पीएसआय प्रमोद चव्हाण यांनी विशेष भूमिका पार पाडली.