महाराष्ट्रात मराठा समाजाला आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाच्या आधारावर शैक्षणिक व नोकरीमध्ये आरक्षण मिळावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पुढे येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , अजित पवार सकारात्मक आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दोनवेळा आरक्षण मिळवून दिले असल्याचा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केला आहे.
२०१८ मध्ये त्यांनी मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) प्रवर्गातून विधिमंडळाच्या माध्यमातून एकमताने १६ टक्के आरक्षण मिळवून दिले होते. २०२४ च्या फेब्रुवारी महिन्यात महायुती सरकारने विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक २०२४ सादर करून , ते एकमताने मंजूर केले. या विधेयकाद्वारे मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत १० टक्के आरक्षण आरक्षण देण्यात आले असेही केदार सावंत यांनी सांगितले .
