इचलकरंजी, कायमचा आणि परंपरागत मतदारसंघाची इतर मतदारसंघात विभागणी झाल्यामुळे आता इच्छुक उमेदवारांनी आणि माजी नगरसेवकांनी शेजारच्या मतदारसंघात संपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी मतदारसंघाशी सलगी वाढवल्यामुळे चर्चेचा विषय बनला आहे.
ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान महानगरपालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. तब्बल सहा वर्षानंतर लोकनियुक्त सभागृह महानगरपालिकेत येणार आहे. आपण महानगरपालिकेच्या होणाऱ्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून सभागृहात पोहोचावे यासाठी इच्छुकांची त्याचबरोबर माजी नगरसेवकांची धडपड सुरू झाली आहे. अनेक इच्छुकांनी आता गणपतीनंतर आपले पत्ते खोलण्यास सुरुवात केली आहे. गणपतीच्या अगोदर जर इच्छुकअसल्याचे सांगितल्यास अनेक मंडळे संपर्क साधण्याची शक्यता होती. त्यामुळे काहींनी हुशारी दाखवत इच्छुक असल्याचे सांगितले नाही.
आता मात्र, आपण इच्छुक असल्याचे आणि आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिकेची निवडणूक लढवणार असल्याचे सांगत आहेत. जे माजी नगरसेवक आहेत त्यांनी पूर्वीच्या मतदारसंघात काही कामे केले आहेत. त्यांचा तिथे मोठा संपर्क ही आहे परंतु नवीन झालेल्या चार सदस्य प्रभाग रचनेमुळे सर्वच प्रभागांची रचनापूर्णपणे बदलली आहे. अनेक प्रभाग हे शेजारच्या प्रभागात गेले आहेत. तर काही शेजारच्या प्रभागातील संबंधित भाग त्या प्रभागात अल आहेत. प्रभाग रचना जाहीर झाल्यापासून कोणता भTग आपल्या प्रभागात आला आहे. याचाअभ्यास इच्छुक उमेदवार करीत होते. आता त्यांनी प्रत्यक्ष त्या भागात असलेल्या आपल्या ओळखीच्या व्यक्तीशी सपक साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. जेणे करून त्या व्यक्तीच्या माध्यमातून त्या भागात संपर्क वाढवता येईल आणि निवडणुकीच्या काळामध्ये त्याचा उपयोग करता येईल. त्या दृष्टीने प्रयत्न जोरात सुरू आहे. काही माजी नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात अनेक भागात पूर्वीपासूनच संपर्क ठेवल्यामुळे त्यांना प्रभाग कसाही पडू दे आपल्याला काही फरक पडत नाही अशी भूमिका त्यांची आहे. तर आपल्या म्हणण्याप्रमाणे प्रभाग पडला त्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. आपण एका भागात काम केले आणि तो भागच दुसऱ्या प्रभागात गेला असेही ते बोलताना दिसत आहेत
आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. अनेक इच्छूक मंडळी महानगरपालिकेत येवून प्रारूप प्रभाग रचनेची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. त्याचबरोबर निवडणुकीसाठी लागणारे अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महानगरपालिकेत इच्छूक मंडळी ये-जा करताना दिसून येत आहेत.
