विट्याजवळील कार्वे हद्दीतील औदयोगिक वसाहतीत किमान २०० च्या वर प्लॉट्सपैकी सध्या केवळ ४० ते ५० उद्योग सुरु आहेत. कोट्टयवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या इमारती अक्षरश; पडून आहेत. ड्रग्ज कारखान्यामुळे बदनाम झालेल्या या वसाहतीला नवा लौकिक देण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
विटा- सांगली रस्त्यावर कार्वे हद्दीत औद्योगिक वसाहतीसाठी तत्कालीन उद्योगमंत्री डॉ. पतंगराव कदम आणि आमदार सदाशिवराव पाटील यांच्या पुढाकाराने पन्नास एकर जमीन संपादित केली. उद्योजकांना २००९ नंतर भूखंड वितरित करण्यात आले. सर्व प्रकल्प सुरवातीला चांगले चालले. परंतु केंद्र सरकारची चुकीची धोरणे आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे यातील अनेक प्रकल्प बंद पडले. सध्या केवळ ४० ते ५० प्रकल्प मोठ्या अडचणीतून सुरु आहेत. काही उद्योजकांनी गुंतवणूक म्हणून प्लॉट पडून आहेत.
पलूस येथील यशवंत पाणीपुरवठा संस्था या औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवते. महामंडळाने २ कोटी रुपये पाणी योजनेला खर्च केला आहे. पाणी पुरवठ्यासाठी चार पंप आहेत. त्यातील दोन सुरु व दोन बंद अवस्थेत आहेत. उद्योजकांना टँकरने पाणी आणावे लागते. वीज सतत खंडित होते. उपकेंद्राची क्षमता वाढविणे आवश्यक आहे. ट्रान्स्पोर्टीची सुविधा नाही. कुशल कामगार मिळत नाहीत. स्वतंत्र पोलीस चौकी नाही.
औद्योगिक विकास महामंडळ करते काय ?
मुख्यतः पाणीप्रश्न सोडवला आहे पाहिजे. २४ तास वीज पाहिजे. विविध उद्योगांच्या परवान्यासाठी औदयोगिक भवनामध्ये एकखिडकी असली पाहिजे. विविध उद्योगांच्या परवान्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाने प्रयत्न केले पाहिजेत,अशी अपेक्षा म्यॅन्युफॅक्चरींग असो. चे अध्यक्ष रवींद्र बेंडखळे., यांनी व्यक्त केली तर, केंद्र व राज्य शासनाची अपुरी धोरणे , महागडी वीज , कामगार टंचाई , कमालीची स्पर्धा , जीएसटी यासारख्या कारणांनी छोटे उद्योग चालविणे व टिकवून ठेवणे मुश्किल होत असल्याचे यंत्रमाग उद्योजक किरण तारळेकर यांनी सांगितले.
