विटा जाधववाडी ते खानापूर रस्त्यावर जाधववाडी हद्दीत भरधाव येणारी मोटार (क्र. एमएच १२ एमडब्ल्यू ३३६३) अडवत विट पोलिसांनी घातक शस्त्रे जप्त केली. यावेळी पोलिसांनी प्रवीण उत्तम संकपाळ (वय २८, रा. डफळापूर, ता. जत) व संतोष किसन दबडे (वय ४७, रा. जाधववाडी, ता. खानापूर) यांना अटक करून त्यांच्या ताब्यातील विनापरवाना दोन धारदार तलवारी व एक कोयता, तसेच चारचाकी असा सुमारे ४ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.हि घटना कारीचा म्हसोबा येथील संभाजी शिंदे यांच्या पत्र्याच्या शेडजवळ घडली.
संशयित दोघेही जिल्हा पोलिस प्रमुखांच्या आदेशाचे उल्लंघन करून विनापरवाना प्राणघातक शस्त्रांसह मोटारीतून भरधाव निघाले होते. यावेळी विटा पोलिसांनी प्रवीण संकपाळ व संतोष दबडे या दोघांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील मोटारीसह दोन धारदार तलवारी, एक कोयता, असा सुमारे ४ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.