पट्टणकोडोली, (ता. हातकणंगले) येथील समस्त जैन समाजातर्फे श्री १००८ भगवान आदिनाथ व पद्मावती माता यांची पालखीतून जैन मंदिरापासून गावातील प्रमुख मार्गावरुन सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
गावच्या विहिरीतील पाण्याने भगवान आदिनाथ व पद्मावती माता यांचा जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर हनुमान मंदिरापासून गावातून मिरवणूक पुढे मार्गस्थ झाली. या मिरवणूकीमध्ये महिला इंद्रध्वज व कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. मागील १६ दिवसांपासून मंदिरामध्ये षोडशकारण नोपी व दसलक्षण नोपी सुरु होती. यामध्ये २५ हून अधिक श्रावक-श्राविका सहभागी झाले होते. यावेळी १६ भावना व १० धर्मांची आराधना करण्यात आली. अजित पंडित व धनंजय पंडित यांनी पूजापठण केले. यावेळी मोहन वळीवडे, धनंजय मगदूम, प्रकाश खटकोळे, अनिल शिरगुप्पे, आप्पासो लडे, अनिल खड्ड, प्रकाश लडे, माणिक शिरगुप्पे, प्रकाश खड्ड, कुमार डूम यांच्यासह दिगंबर जैन मंदिर समाज, श्रावक-श्राविका, वीर सेवा दल पदाधिकारी यांनी सहभाग घेतला.
