सांगोला(Sangola) तालुक्यातील २० कोटी ८६ लाख व मंगळवेढा तालुक्यातील १२ कोटी ७ लाख रुपयांची चारा छावण्यांची बिले थकीत आहेत. गेल्या काही वर्षणापासून सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील लोकप्रतिनिधींकडून यासाठी शासन दरबारी पाठपुराव सुरु आहे .लवकरच प्रलंबीत अनुदान प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिले आहे. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील व आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत प्रलंबित बिलासंदर्भात बैठक पार पडली . यावेळी मुख्य सचिव तसेच सदरच्या खात्याचे सचिव व इतर अधिकारी उपस्थित होते, राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांचीही आ. देशमुख यांनी भेट घेतली . छावणी चालकांच्या या मागणीवर आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी यापूर्वीही वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. तसेच विधिमंडळात आवाज उठविला आहे.
सांगोला व मंगळवेढा तालुकयातील छावणी चालकांनी चारा छावणीच्या माध्यमातून अनेक जनावरे जगवली आहेत. तत्कालीन दुष्काळजन्य परीस्ठीतीमध्ये तालुकयातील पशुधन व पशुपालक यांचे हित डोळ्यासमोर ठेवून या छावणी चालकांनी मोठी आर्थिक गुंतवणूक केली होती . कर्ज काढून छावण्या चालवल्या आहेत. काही चारा छावणी चालकांनी सुधारीत प्रस्ताव दिलेले असून लवकरच प्रलंबित अनुदानाचा विषय मार्गी लावला जाईल असे आश्वासन मंत्री मकरंद पाटील यांनी दिले आहे.
