शिवनेरी पतसंस्थेला तीन कोटींचा ढोबळ नफा   

शिवनेरी नागरी सहकारी पतसंस्थेला सन २०२४- २५ च्या आर्थिक वर्षात ३ कोटी ४५ लाख ४१ हजार रुपयांचा ढोबळ नफा झाला असून सभासदांना ११ टक्के लाभांश दिला जाईल, अशी घोषणा संस्थापक चेअरमन तानाजी सूर्यवंशी यांनी केली. आष्टा येथील शिवनेरी पतसंस्थेच्या १९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

याप्रसंगी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे, माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, अनिल फाळके, हणमंतराव सूर्यवंशी हे प्रमुख उपस्थित होते. तानाजी सूर्यवंशी म्हणाले, संस्थेकडे ५८ कोटी इतक्या ठेवी जमा असून संस्थेने ५४ कोटी ५३ लाख इतके कर्जवाटप केले आहे. संस्थेची गुंतवणूक २७ कोटी ६३ लाख असून संस्थेला निव्वळ नफा १ कोटी ४४ लाख ३१ हजार इतका झाला आहे. संस्थेचे खेळते भांडवल ८५ कोटी ७ लाख इतके आहे. संस्थेमार्फत शालेय गुणवंत विद्यार्थी तसेच सेवानिवृत्त अधिकारी व नवीन नियुक्त अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. 

चेअरमन विलास गायकवाड यांनी स्वागत केले. याप्रसंगी रघुनाथ जाधव, महेश गायकवाड, अनिल फाळके, उमेशचंद्र ओतारी, रमेश माळी, अविनाश मस्के, पोपट खोत, दिलीप वग्याणी, कौशिक वग्याणी, बाबासो सिद्ध, विराज शिंदे, मोहन गायकवाड, संतोष घनवट, पांडुरंग खोत, रमेश जाधव, संजय माळी, पोपट शेळके, अविनाश मस्के, अरुण वाघमारे, योगेश सूर्यवंशी, सौ. संगीता सूर्यवंशी सौ. रागिनी सावंत, सौ. झिनत आत्तार, शोभा गायकवाड, मॅनेजर सुरेश पुजारी व सभासद उपस्थित होते.